Tuesday, February 20, 2007

ओढ..

दुरवर पसरलेले हिरवेगार डोंगर
त्यावर चरणार्या जर्सीज़..
उधान वारा.. पाण्याला अलगद स्पर्श करणारा
साक्ष त्या वरंवार उठणार्या तरंगांची

पुन्हा दिसले आकाशात उडणारे तेच दोन पक्षी
निळ्या आभाळात राहणारे,
कधी काळ्या-पांढर्या ढगाआड लपणारे..
सदैव एकमेकांचे सारथी..

दोघांमधे मौन परंतु
भाषा आहे अमोघ वक्त्रुत्वाची..
क्षणात बागडणारे हे पक्षी
ना सीमा आहे कोणत्या प्रांताची ना कोणत्या देशाची.

पुन्हा दिसले .. परन्तु आज निघालेत लगबगीने
पाहुन काळ्या घनांना..
डोळ्यात त्यांच्या अनाम ओढ
चींता असावी त्यांच्या पिल्लांची..

हिरव्यागर डोंगरावरील तेच पक्षी :)

1 comment:

Parag said...

Nisarg kavitecha navin trend ka...changala ahe...aage badho!