Wednesday, April 04, 2007

The magical kingdom of Disneyland :)

विचार करत करत मन वेड्या पाखरासारखे उडत शाळेतल्या दिवसात गेले.. शाळेतील सकाळी ७:२० ची प्रार्थना आठवली.. ७:३० ला पहिला वर्ग असायचा..आठवण :) वपुर्ज़ामधे व.पु. म्हणतात की आठवणी ह्या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. बाहेरुन पाहिल्यास त्यात किती मुंग्या आहेत ह्याचा अंदाज़ येत नाही पण एक मुंगी जरी बाहेर पडली तर तीच्या मागोमाग असंख्य मुंग्या बाहेर येतात. तर शाळा.. घर शाळेपासुन almost १.५ miles अंतरावर होते. त्यामुळे पायी चालत जाणे म्हणजे at least ३० minutes लागायचे. तेवढ्या भल्या पहाटे आईने बनवलेला डब्बा.. त्याची चव कधीच कोणत्या जेवनाला येणार नाही.
शाळेला जाताना चिंचेच्या झाडाचा चिगोर खायचो. शाळेत खेळाच्या तासात निलगिरीच्या टोप्या वेचलेल्या आठवतत. भिंगरीच्या झाडावरील भिंगर्या तोडायच्या आणि मित्रांसोबत त्यावर पैज लावायची. विटीदांडु, लपंडाव, पावसाळ्यात गोगलगायी पाहण्याची स्पर्धा आणि मैदानावर असणार्या झर्यात शंख-शिंपले शोधण्याची घाई.. चित्रकलेच्या तासात चित्र काढायचे.. चित्र राजवाड्याचे, डोंगराचे, नदीचे, cartoons चे, प्राण्यांचे.. वेगवेगळ्या fantasies चे. अशेच fantasy world ४ महिन्यापुर्वी पाहिले .. The Happiest homecoming on Earth .. Disneyland :-)
Walt Disney ने त्याच्या imagination, creativity आणि स्वप्नांच्या जोरावर हे Magical Kingdom तयार केले. त्या काळातील (in १९५३) हि कल्पना भन्नाट आणि त्याचे भन्नाट विश्वही निर्माण झाले. Walt Disney चे एक वाक्य आहे - " Disneyland will never be completed. It will continue to grow as long as there is imagination left in the world.." Yes, its all about imagination.. आम्ही तीघे सकाळी ८ वाजता Disneyland ला पोचलो. आमच्या tour guide चिनी ताई आम्हाला guide करीत होत्या. The day started with bang.. Adventureland. त्यात Indiana Jones, पाण्यातील Winnie the Pooh ची राईड - Wonderful experience - राईड जबरदस्त होती. नंतर आम्ही आफ़्रिकेच्या जंगल्स मधुन गेलो.. Jungle Cruise. Haunted Mansion बाहेरुन तर बरच भयानक वाटत होतं पण मधे गेल्यावर आमचा पोपट नक्कीच झाला ;) पुढिल विश्व दाखवणारे Tomorrowland - त्या मधील Space shuttles आणि Star wars च्या राईड्स ह्या आधुनिक जगाच्या नक्कीच छाप पाडणार्या होत्या. जेवनानंतर म्हणजे burger खाल्ल्यानंतर ;) आम्ही वळालो Fantasyland आणि Mickey Toontown कडे. कल्पनाशक्ती असावी तर अशी! मिकीच्या घराच्या hall पासुन kitchen पर्यंत सगळं खर-खुरं वाटत होतं. Tea Party, Mountain rides, Pirates of Caribbean.. सगळं काही छान होतं .. अमेरीकन लोकांच्या ऊत्सहाला नक्कीच मानायला पाहिजे... But, the best was yet to come!!
Unforgettable Famous Parade of Disneyland :) The most attractive.. तो अनुभव इतका अभुतपुर्व आणि सुंदर होता की त्याच्यासाठी शब्दच नाहीयेत. आतिशय मग्न होऊन, स्वत:चे भान विसरुन आम्ही त्याचा आनंद घेतला. Parade हि main gate पासुन Sleeping Beauty Castle पर्यंत चालली. Santa त्याच्या सगळ्या साथीदारांसोबत parade मधे होता. It was unbelievable.. all cartoon characters, music, dance, enthusiasm, environment .. it was amazzing .. Parade नंतर Celebrations time.. Beauty Castle वर fireworks झाली आणि लगेचच artificial snow.. It was jubilation of great creativity and imagination!! The great fantasy world - Disneyland :)