Saturday, June 07, 2008

स्वप्न

आज पुन्हा रस्त्याच्या मध्यावर मी उभा
समजेना कुठली वाट पकडु?
पुन्हा धुसर आणि अद्न्यात ह्या वाटा
ह्यातुन कसा माझा मार्ग शोधु?

निघालो होतो काही वर्षांपुर्वी ह्या प्रवासावर
डोळ्यात जग जिंकण्याचे स्वप्न घेऊन
लढत होतो स्वबळावर
मनात निर्धार आणि रक्तात ताकद घेऊन

विचारांचा मगोवा घेत
आठवण आली जुन्या वाटांची
दाही दिशांच्या संकटांना सामोरे जात
सापडली होती वाट इन्द्रधनुश्याची

आयुश्याच्या समस्यांना उत्तरे देत
वाट मात्र सुरु होताच संपली
कुठे गेल्या ह्या यशाच्या वाटा
जणु सगळ्या कुलुपांची चावी हरवली

अपेक्षाभंग झाल्या, स्वप्नं तुटली
जुन्या वाटा सोडल्या आणि नविन वाट पकडली
मृत्युलेख लिहायला मला आवडत नाही
भ्याड होऊन युध्ह सोडणे मला जमणार नाही

जिद्द आहे जीवंत आणखी
जग जिंकण्याचे स्वप्न मेले नाही
मान्य आहे मोडुन पडलोय, परन्तु संपलो नाही
संपेन ही कदाचित, .... परन्तु लढणे सोडणार नाही.

P.S: It's just a poem :)

5 comments:

Anonymous said...

Typical Kedar's trademark!
khupppach chhaan.This fighting spirit will take you to great heights.May you find new dreams to follow & new horizons to conquer.Fight back dear unstoppable warrior!May all your dreams come true.

Anonymous said...

Nice marathi reading after very long time.. tere pote school book mai padenge isko :) Keep fighting ATB

Nilesh Pardeshi

Shardul said...

Bro.......good to read ....

Kedar is better known as fighter....warrior.....

expecting more from u....but something about your victory....

war is uncertian..... victory is satisfactory......

Hold on bro....keep ur spirit up.... :)

Parag said...

Dude - Good one! baryach divsanni kavita "kelis" :) [ha ha ha you know which word I dropped]...pan changli ahe...shevati postive he mahatvache

Unknown said...

Great!! Hey u know what....end of the poem reminded me the famous marathi kavita "Kana"