Saturday, December 16, 2006

कदाचित आपले पण असेच आहे..

काल पहिल्यांदाच अतिशय जोराच पाउस मी येथे पाहिला. वारा जोरात सुटला होता, जनु त्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर उमगत नसावे म्हणुन त्या उत्तराच्या शोधात बेभान होवुन तो धावु लगला होता. परंतु वार्याच्या आणी पावसाच्या ह्या गणितात झुंज चालली होती ती झाडाच्या एका थकलेल्या लाल-पिवळ्या पानाची. कधीतरी जन्मलेले हे पान कदाचित ह्याच रंगाने अवतरले असेल .. कालन्तराने हिरवे होवुन त्याने बरेच काही पाहिले असेल मात्र आपल्यासरखे पावसाळे पहाणे ह्या पानाच्या आयुश्यातच नसावे. त्याच्या वरील रेषा मला कधी कधी आपल्या हातांवरील रेषांसारख्या वाटतात. परन्तु बरेच अंतर आहे त्याच्या आणि आपल्या हातांवरील रेषांमधे आणि तेवढेच साम्य सुद्धा आहे. एके काळी झाडांवरील ईतर सर्व पानांसोबत राहणारे हे पान आज एकटेच झुंज देत आहे. बहुदा आपले पण असेच आहे...