क्षितीजावरुन कधी आपल्या ह्या अनोख्या जगाचे चीत्र रेखाटावे तर कधी सागरी किनार्यावरील ओल्या वार्याशी मैत्री करावी.. भन्नाट कल्पना आहेत, right?
कधी जीव ओतावा आपल्या लोकांवर तर कधी जीवापाड प्रेम करुन अमाप लळा लावावा एखाद्याशी ..
धुंद होऊन कधी आपल्या मित्रांसोबत गायलेलं गाणं म्हणावं तर कधी बेभान होऊन आपल्या गावी पळत सुटावं.. कधी बालपणीच्या शाळेत जाऊन 5th चा class attend करावा आणि शाळा सुटल्यावर वेड्या पावसात मनसोक्त भिजुन घरी परतावं.. College च्या कट्ट्यावर बसुन छान गप्पा माराव्यात मित्रांशी कधी class सोडुन hostel च्या TV रूम मधे Cricket match पहावी..
बरच काही वाटतं ह्या वेड्या मनाला .. सुरेख साथ देतोय जीवनाची पण ऊणीव नक्कीच आहे आईच्या प्रेमळ हातांची आणि जीवलग अश्या मित्रांची...