Sunday, January 07, 2007

Cooking - its difficult to improve perfection ;-)

वरनफळ, हे एक असं नाव आहे जे ऐकुन आपल्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे नाहीतर आपल्या जीभेला रसीकतेची चव आलेली नसावी. भरपुर दिवस झाले होते वरनफळांचा आस्वाद घेतला नव्हता. मग ठरवले की आज ह्याचा सुध्द्दा प्रयोग करावा. Lets try :-) तशी cooking मध्ये theory तर सगळ्याच गोष्टींची माहीत आहे. इडली पासुन ते पुरनपोळी पर्यंत... ;-) परंतु 12 च्या अभ्यासासारखे cooking मध्ये नाहीये. ईकडे theory पेक्षा practicals नाच महत्व आहे. तुम्हाला सगळे मार्क्स हे practicals वरच मिळतात. Moreover, practicals are difficult than theories. तर मग practical ची अशी सुरुवात झाली.
सुरुवातीलाच एक million dollor प्रश्न असा पडला की आता कच्ची पोळी कुठून बनवायची? कारण गव्हाचे पीठ आणुन पोळी बनवने म्हणजे requirement analysis मध्येच project ची deadline संपणे. मग half-cooked Indian chapatthis वापरायचे ठरवले. चींच भीजत घातली आणि डाळ शिजवली. जसा पैशाने पैसा बनतो तसेच अनुभवाचे असते. अनुभवावरुन अनुभव येतात. [(1 Number Statement ;-)] चींचेचे वरन बनवन्याचा तर दांडगा अनुभव होता, मग तेच केले, अतिशय खमंग आणि तिखट-आंबट वरन ready झाले... आता त्याच half-cooked पोळींचे तुकडे करुन वरनात टाकायला सुरुवात केली. मग cook व्हायला थोडा वेळ लागतो म्हणुन gas full करुन बाकी कामात गुंतुन गेलो, पन दुसर्या कामात ईतका मग्न झालो की भान हरपुन गेले. मग 30 मिनिटांनी पाहतो तर काय half-cooked कच्ची पोळी शिजुन त्याची almost gravy झाली होती आणि वरनफळ म्हणजे आंबट वरनात कुस्करलेली पोळी. मग कय !!! Taste करुन पाहण्याची वेळ आली ... delay किती करणार आता!!. आई शप्पथ अप्रतिम चव आली होती.. एकदम मस्त झाले होते :) आणि असा प्रयोग frequently करु लागलो ;-)