आज मज वाटते की पाणी व्हावे..
तुझ्या काळ्या डोळ्यांची खोली अनुभवावे..
चुकून ही त्यातुन कधी ना बाहेर पडावे..
सदैव तुला आनंदी ठेवावे..
का ओढ लागते सागराला किनार्याची?
का किनारा वाट पाहतो सागरी लाटांची?
चंद्राला का साथ लागते काळ्या डागाची?
काळा डाग का चंद्रावर कधी रुसत नाही?
थकलेले आभाळ का टेकते जमीनीला?
का जमीनीला काळजी वाटते आभाळाची?
का रंग असतो गुलाबी ह्या थंडीचा?
का सुगंध येतो ह्या ओल्या मातीचा?
का चातक आतुर असतो पावसासाठी?
का मयुर आनंदीत होतो मेघांसाठी?
का पतंगा फिरतो दिव्याभोवती?
का? असे का?