Saturday, May 13, 2006
प्रेमाची तारांबळ !!
चंदेरी काळोखी चादर सरत होती,
सावल्यांचा खेळ हा सुरु होणारच होता.
किलबीलणारी पाखरे जागी झाली होती,
प्रकाशाची चाहुल सर्वांनाच लागली होती.
घटका पुढे चालली होती, आतुरता वाढली होती,
परंतु प्रकाशाचे आगमन काही झालेलेच नव्हते.
ईतक्यात असे कळले कि काळोखाचे प्रकाशाशी प्रेम झाले,
आणि प्रकाशाचा जीव हि काळोखावर जडला.
श्यामरंगातूनी वाटा उजळल्याच नाही,
पाखरांनाही कळेना किलबील करावी की नाही,
सुर्यफुलाला काही समजेना, सावल्या रुसुन बसल्या.
आकाशातील ढगांनी विचार करायला सुरुवात केली.
सैरावैरा धावणारा वारा सुर्याच्या शोधात निघाला.
ना दिवस होता ना रात्र होती, काय करावे काही सुचेना,
प्रेम झाले दोघांचे खरे,
परंतु अशा प्रकारे सर्वांची तारांबळ उडाली. :-)
Subscribe to:
Posts (Atom)