Saturday, February 18, 2006

प्रेमाचा विश्वास !!


एकदा प्रेमाने विचारले विश्वासास,
आपल्यातील नाते काय?
विश्वास उत्तरले.. मीच तुझे प्रेम
आणि तुच माझा विश्वास !!

..केदार !!

Thursday, February 16, 2006

आई ..


आज, मज सांग तु देवा,

का दिलीस तीला इतकी प्रचंड माया.

हातात बोट घेऊनी बालपणी,
पडता पडता चालणे शिकवीले तीने मला.

तीनेच दिली डॊळ्यात जगण्याची दृष्टी,
हे जीवनगाणे गाण्याची सुवर्ण संधी.

कधी तळहाताच्या फोडासारखे जपले तीने मला,
तर कधी अवघड मार्गावरुन जाण्याची दिली शक्ती.

आयुष्याच्या ह्या वाटेवर तीनेच घडवीले आहे मला,
लावला आहे अमाप लळा माझ्याशी.

कशी सांगु गाथा त्या माऊलीची? कशे फेडू पांग तीचे?
आज, मज सांग तु देवा....

- केदार.

Monday, February 13, 2006

सुक्ष्म तो दवबिंदु !!!


असला जरी सुक्ष्म तो दवबिंदु,
अवनीला सप्तरंग देऊन जातो.
मान्य आहे की आहे तो क्षणभंगुर,
मात्र त्या क्षणातच आपले महत्व पटवुन जातो.

- केदार.

शिंपल्यातील मोती....


शिंपल्यातील मोती खुप सुखी असतो,
तळपत्या सुर्यापासुन सदैव दूर असतो,
बेभान वा~याचा त्यास गंध ही नसतो,
सागराच्या तळाशी जरी असला तरी सुखाच्या शिखरावर असतो.
शिंपल्यातील मोती....


- केदार शेवाळकर.

क्षितिजापलिकडे..


क्षितिजापलिकडे पाहण्याची दृष्टी असेन,
तर क्षितिज नक्की गाठता येतं.

आपल्या रक्तातच धमक असेन,
तर जग ही जिंकता येतं.

आपले क्षितिज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलिकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायचं असतं.

असते आपल्या रक्तात जीद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदा तरी अनुभवायचं असतं.


- केदार शेवाळकर.

हि आहे सुरुवात!!


विचारांचा जेव्हा पुर येतो, तेव्हा ते शब्दरुपात ओसंडुन वाह्तात आणि लेखनीच्या माध्यमातुन कागदावर उतरतात. लिहिण्याची इच्छा आधीपासुनच होती. मग अधूनमधून डायरी लिहायला सुरुवात केली. रसिक मंडळी विचारतील मग ब्लॉग कशाला? काही गोष्टीच डायरीपुरत्या मर्यादित असतात. उरलेल्या शब्दांच्या आठवणी व जिव्हाळा म्हणजे हा ब्लॉग.

- केदार शेवाळकर.